महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य, यशोमती ठाकूरांनी दिला शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा

साम टीव्ही
रविवार, 6 डिसेंबर 2020
  •  
  • महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य
  • 'काँग्रेसच्या श्रेष्ठींबद्दल भाष्य करणं बंद करा'
  • यशोमती ठाकूरांचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य रंगताना दिसतंय. महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिलाय.

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळूनही काही मुद्यांवरुन महाविकास आघाडीत धूसफूस असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि राज्याच्या महिला-बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ताज्या ट्वीटमुळे ही शक्यता निर्माण झालीय. 

राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबाबत मतप्रदर्शन केलं. पवारांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावरुन नाराज झालेल्या यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये थेट पवारांचा उल्लेख दिसत नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसतंय. सरकार स्थिर राहावं वाटत असेल तर काँग्रेस हायकमांडवर टीका करणं टाळावं, असा इशाराच ठाकूरांनी दिलाय. 

अनेक पक्षांच्या आणि त्यातही विरोधी विचारसरणींच्या पक्षात वाद होणं, अगदी स्वाभाविक आहे. यापूर्वीही अनेकदा महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मविआ सरकारमधील धुसफूस समोर आलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live