Dhoni Special Blog | खेळात कोणत्या वयापर्यंत वय ही फक्तं संख्या आहे...

Dhoni Special Blog | खेळात कोणत्या वयापर्यंत वय ही फक्तं संख्या आहे...

धोनीच्या सद्ध्याच्या कामगिरी नंतर अपेक्षित प्रतिक्रिया उमटत आहेत. धोनीची कर्तबगारी लक्षात घेता त्याला जागतिक क्रिकेटमध्ये सुपरमॅन स्टेटस मिळालेला आहे. जे अगदीच रास्त आहे. धोनीच्या फलंदाजीचे आणि यष्टीरक्षणाचे लकाकणारे यश हे मुख्यत्वे त्याची कौशल्ये, चपळता, एनवेळची अचूक निर्णय क्षमता,फटक्यांची निवड आणि त्याची आश्चर्यकारक अंमलबजावणी, ताकदीचे फटके,खेळ विलक्षण संयमाने खोल घेऊन जाऊन हेवा वाटावा असा फिनिश करण्याचे कसब ह्या सगळ्या गुणांच्या संयुगात आहे. खेळाडूत ही सर्व कौशल्ये किती वयापर्यंत अबाधित रहातात ह्याची काही सिद्ध फॅक्टस आहेत तर काही अजून मानवाला समजलेली नाहीत.

नजीकच्या काळात निवृत्त झालेले काही क्रिकेट मधले ग्रेट खेळाडू पाहिले उदा. पॉंटिंग,जयवर्धने,संगकारा,तेंडुलकर तर वयाच्या पस्तीशी नंतर ह्या सर्वांनाच सर्वोच्य कामगिरी करणे अवघड होत गेल्याचे दिसले. अलिस्टर कूक तर भरात असताना ज्या वेगाने धावा करत होता त्यामुळे तो तेंडुलकरच्या रेकॉर्ड मोडणार असे इंग्लंड मधल्या विश्लेषकांनी भाकित करून टाकले होते.पण वयाच्या 33 व्या वर्षीच पीक परफॉर्मन्स आणि वय यांचा मेळ बसेना म्हणून तो निवृत्त झाला.

वयाचा परिणाम स्नायूंवर(स्नायूची झीज  होणे,atrophy, किंवा त्यांची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणे,hypertrophy,)मेंदू आणि स्नायूंच्या समन्वयांवर होणारा परिणाम, चेता पेशींमधील समन्वय वगैरे वर होतो का हे बघण्याकरता बास्केट बॉल मधील मायकेल जॉर्डन,करीम अब्दुल जब्बार,चार्ल्स बार्कले यांच्या कामगिरीचा अभ्यास करून काही अनुमान शास्त्रज्ञानी काढली.त्याप्रमाणे त्यांच्या फ्री शॉट्स मधील गुणांवर परिणाम झालेला नसला तरी तरुण खेळाडूंना डॉज करून स्कोर करण्यात जवळजवळ 30%चा फरक पडलेला आढळला. पस्तीशी नंतर शरीरावर होणारे  काही परिणाम दृश्य स्वरूपाचे असतात तर काही सूक्ष्म असतात पण परिणामकारक असतात.पिळदार शरीरयष्टी,सिक्स पॅक ऍबडोमेन,उत्तम स्टॅमिना हे असले तरी कौशल्यांचा स्तर आधीचा रहात नाही.एखादाच फेडरर किंवा गॉर्डी होव(हॉकी स्टार)त्याला अपवाद असतो.

धोनीच्या बाबतीत गेल्या दोन वर्षात शॉट सिलेक्शन,बॅटिंगच्या वेळेसची पूर्वीची निर्णयक्षमता, प्रत्येक वेळेस सीमारेषा क्लिअर करण्याचे स्किल, फिनिशिंगच्या टक्केवारीत झालेला मोठी घसरण ह्यातून एज इज कॅचिंग अप हे दिसून येत होते.सर्व फॅन्स त्याच्या त्या एका मॅजिकल इंनिंग कडे डोळे लावून बसले होते ज्याने जुना धोनी तसाच आहे तोच ग्रेटेस्ट फिनिशर आहे हे पटवून देता येईल.पण खूप प्रतीक्षेनंतर देखील,अनेक इंनिंग नंतर देखील तो क्षण येत नाहीये. विज्ञान आणि डेटा सांगतो की त्याची लढाई against all odds चालू आहे.वय ही फक्त संख्या आहे हे सर्वोत्कृष्ट, सातत्याच्या कामगिरी करिता किती वयापर्यंत म्हणता येईल ह्याचा सुद्धा विचार व्हायला हवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com