कोरोनाकाळात व्यंगत्वावर मात करत झाडाच्या पानांवर महेश म्हस्केची अफलातून कलाकृती

विश्वभूषण लिमये
सोमवार, 3 मे 2021

सोलापूर जिल्ह्यातील जामगांवच्या महेश म्हस्के या युवा चित्रकाराच्या बाबतीत. जन्मतः डाव्या डोळ्याने अंध असूनही आपल्या व्यंगत्वावर मात करीत महेशने चित्रकलेच्या क्षेत्रात मोठे नाव कमावल आहे.

सोलापूर: मनात जिद्द आणि मनापासून काम करण्याची तयारी असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. याचे तंतोतंत खरं ठरलंय सोलापूर Solapur जिल्ह्यातील जामगांवच्या महेश म्हस्के या युवा चित्रकाराच्या बाबतीत. जन्मतः डाव्या डोळ्याने अंध असूनही आपल्या व्यंगत्वावर मात करीत महेशने चित्रकलेच्या क्षेत्रात मोठे नाव कमावल आहे. Mahesh Mhaskes masterpiece drawing on the leaves of the tree

लॉकडाउनच्या Lockdown काळात चित्रकलेसाठी पेपर मिळत नसल्याने महेश ने चक्क केळी, वड, पिंपळ या झाडांच्या पानावर अफलातून कलाकृती साकारल्या आहेत.  त्याच्या या कलाकृतीचे Drawing फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

महेश म्हस्के हा 29 वर्षीय तरुण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी Barshi तालुक्यातील जामगांवचा Jamgaon रहिवासी आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महेशला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. गाई-म्हशी राखताना चक्क तळ्याकाठच्या चिखलावर त्याने चित्र रेखाटायला सुरुवात केली. आणि तिथूनच त्याला या विषयाची आवड निर्माण झाली असावी. Mahesh Mhaskes masterpiece drawing on the leaves of the tree

शालेय जीवनामध्ये महेशने चित्रकलेची आवड जोपासत अनेक बक्षीस, शिष्यवृत्ती मिळवली. आणि त्याच पैशातून त्याने पुढचं शिक्षण ही पूर्ण केले. बार्शीला कला शिक्षकाची पदवी मिळवल्यानंतर पुढे त्याने पुण्यात Pune जाऊन शिल्पकलेचे धडे गिरवले. मागच्या तीन वर्षांपासून महेश पुण्यातील 'भारती विद्यापीठाती'ल मुलांना चित्रकलेचे शिक्षण देत आहे. गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकांही ठप्प झाल. आणि ते पुन्हा गावी परतले. मात्र लॉकडाऊन दरम्यान चित्र काढण्याची आवड जोपासण्यासाठी लागणारे रंग, ड्रॉईंग पेपर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महेश ने झाडांच्या पानावर कलाकृती साकारायला सुरुवात केली. 

महेश यांनी देवी-देवता, महापुरूषांसह सामाजिक, राजकीय, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींची शेकडो चित्रे पानावर रेखाटली आहेत. 
सोशल मीडियावर महेश यांच्या या चित्रांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक दिग्गज मंडळींनी तर महेश यांना दूरध्वनी वरून कामाचं कौतुक करत प्रोत्साहन देखील दिले आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live