माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर विजयी

 माहिम मतदारसंघातून सदा सरवणकर विजयी

माहीममध्ये सदा सरवणकर यांनी 18614 मतांची आघाडी घेत मनसेच्या संदीप देशपांडे यांना पराभूत केलंय. शेवटच्या फेरीनंतर सरवणकर यांना 61223 मतं तर 
संदीप देशपांडे यांना 42609 मतं मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना 15235 मतं तर 842 मतं  नोटाला मिळाली आहेत.  
माहीममध्ये शिवसेना आणि मनसेत थेट लढत लढत होती. या मतदारसंघात विधानसभेसाठी 47.10 टक्के मतदनाची नोंद झालेली. महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदान झालेल्या मतदारसंघात माहीम मतदार संघाचा समावेश आहे.

शिवसेनेचा ढाण्या वाघ - सदा सरवणकर

विरोधकांच्या मनात नुसती आग, कारण मैदानात उतरलाय ढाण्या वाघ म्हणत सदा सर्वांकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. नेता किंवा आमदार म्हणून जनतेमध्ये न वावरता आपला हक्काचा माणूस, सुख आणि दुःखात आपल्या सोबत राहणारे आपले लाडके शिवसेना भाजप उमेदवार सदा सरवणकर या शब्दात सदा सरवणकर यांनी प्रचार केलाय. सदा सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर सदा सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील आहेत. 

महाराष्ट्रातील मनसे दबंग - संदीप देशपांडे 

मनसेचा सगळ्यात दबंग उमेदवार म्हणजे संदीप देशपांडे. मुंबईतील मराठीचा मुद्दा, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, अरेसाठी केलेलं आंदोलन.. या सगळ्याच प्रमुख चेहरा म्हणजे संदीप देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातंय.  " दर ५ वर्षांनी येणाऱ्या निवडणुका मतदारांनी जर गंभीरपणे नाही घेतल्या तर मतदारांच्या आयुष्यातील फक्त ५ वर्ष नाही तर जवळपास एका आख्ख्या पिढीची उमेद, इच्छा, आकांक्षा बरबाद होतात. त्याचा प्रत्यय हळूहळू महाराष्ट्रातील जनेतला येऊ लागला आहेच. म्हणूनच ह्या वेळेस मतदारांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करायला हवं अन्यथा पुढचा काळ कठीण असेल आणि त्याला मतदारच जबाबदार असतील. या शब्दात संदीप देशपांडे यांनी मतदारांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं 

Web Title: mahim vidhansabha constetuency shivsena leader sada sarvankar won

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com