..अखेर झाला माळेगाव नगरपंचायतीचा श्रीगणेशा 

Malegaon Nagar Panchayat To be functional From Tomorrow
Malegaon Nagar Panchayat To be functional From Tomorrow

माळेगाव :  बारामती (Baramati) तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्व असलेल्या माळेगाव बुद्रूक(Malegaon Budruk) ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याचे आज चतुर्थीच्या मुहुर्तावर स्पष्ट झाले आहे.  राज्य सरकाराच्या नगरविकास खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केल्याने माळेगावात  एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Malegaon Nagar Panchayat has finally started)

त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात एकत्र येत गावकऱ्यांनी शासन निर्णायाचे फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जयघोष केला आहे. विशेषतः शासन निर्णयानुसार (Maharashtra Government) उद्यापासून नियोजित माळेगाव नगरपंचायचे प्रशासक म्हणून बारामतीचे तहसीलदार विजय पाटील(Vijay patil) हे दैनदिन कामकाजाची सूत्रे हाती घेणार आहेत.  

माळेगाव बुद्रूक  ग्रामपंचायत ही लोकसंख्येसह भौगोलिकदृष्ट्या तालुक्यात महत्वपूर्ण मानली जात आहे. या ग्रामपंचायचा पंचवार्षिक कार्य़काळ मागिल चार महिन्यापुर्वी संपला होता. तेव्हापासून या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये व्हावे, यासाठी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या मागणीला पवार यांनीही पाठींबा देत शासनस्तरावर नगरपंचायत अस्तित्वात येण्याकामी कमालीची यंत्रणा हलविली होती.

त्यानुसार नगरविकास खात्यानेही माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक रद्द होण्यासाठी निवडणूक आयोगाला शिफासर केली होती. परंतु दरम्यानच्या कालावधीत तांत्रिकदृष्ट्या व नियमानुसार निवडणूक आयोगाला सदरची निवडणूक रद्द करता न आल्याने त्यांनी निवडणूक कार्य़क्रम जाहीर केली  होती. त्यावेळी १७ पैकी एक जागा वगळता १६ जागांवर इच्छुक असलेल्या ७५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत सदरची निवडून नाकारली होती. (Malegaon Nagar Panchayat has finally started)

त्याकामी बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, दिपक तावरे, दत्तात्रेय येळे, रोहिणी तावरे, शिवराज जाधवराव, दिलीप तावरे, संजय भोसले, अॅड. राहूल तावरे, रणजित तावरे, जयदीप तावरे, रविराज तावरे, रमेश गोफणे, शकील सय्यद, अविनाश गोफणे, प्रशांत मोरे, शौकत शेख, प्रमोद जाधव, भगावन गोंडे, अशोक सस्ते, प्रमोद तावरे, प्रदीप जाधव, नितीन तावरे, निंबाळकर, पैठणकर आदींनी निर्णायक भूमिका घेतली होती.

परंतु त्यानंतरही चार महिन्याचा कालावधी उलटला तरी नगरपंचायतीची अधिसूचना जाहिर झाली, नसल्यामुळे गावात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागणार असल्याचे बोलून दाखवित होते.  मात्र अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बुधवारी नगरविकास खात्याचे (Urban Development Department) उपसचिव सतिश मोघे यांनी माळेगाव नगरपंचायतीची अधिसूचना जारी केली आहे.  तसेच  त्यांनी सदर नगरपंचायची रचना निश्चित होईपर्यंत प्रशासन म्हणून तहसीलदार विजय पाटील यांची नियुक्ती केली आहे.(Malegaon Nagar Panchayat has finally started) 

माळेगाव नगरपंचायत म्हणून उद्या  गुरूवारपासून कामकाज सुरू होणार आहे. शासन निर्णायनुसार जोपर्यंत नगर पंचायतीची रचना तयार होत नाही, तोपर्यंत प्रशासक म्हणून मी कामकाज पाहणार आहे. सुरवातीला गावकऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे लक्षकेंद्रीत केले जाईल. त्यामध्ये नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी देणे, गावातील सार्वजनिक स्वच्छता ठेवणे आणि गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेण्यासाठी विशेष प्रय़त्न केले जातील. त्याकामी गावातील विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकाऱ्यांचे सहकार्यही घेतले जाईल, अशी माहिती प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितली.

Edited By-Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com