आई, मी हे जग सोडून जातेय...असे हातावर लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे, असे हातावर लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्लीः आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे, असे हातावर लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंद्रपुरी परिसरात राहात असलेली विद्यार्थिनी सातवीच्या वर्गात शिकत होती. 1 डिसेंबर रोजी तिने हातावर मजकूर लिहून आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने या घटनेबाबत शाळेतील दोन शिक्षकांना जबाबदार धरले आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मित्रांनी मला सांगितलं की, शाळेतील दोन शिक्षक संपूर्ण वर्गासमोर तिला चारित्र्यहीन म्हणाले होते. ज्यामुळे ती दुखी होती, अशी माहिती मुलीच्या आईने दिली. मुलीची आई तीस हजारी न्यायालयात वकील असून तिथेच त्यांनी शेवटचे आपल्या मुलीला पाहिल्याचे सांगितले. याबाबत पुढील तपास सूरू आहे.'

मुलीच्या आईने पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर मुलीने पंख्याला गळफास घेतल्याचे लक्षात आले. यावेळी तिने हातावर मृत्युपूर्वी लिहीले होते की, आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे. माझ्या मुलीने एक शिक्षक रोज आपल्यावर ओरडत असल्याचे सांगितलं होते. शिवाय, इतर शिक्षकांसमोरही अपमान केला होता. यानंतर शाळेच्या बाथरुममध्ये जाऊन रडल्याचे मुलीने सांगितले होते. मला वारंवार शाळा बदलण्याचा आग्रह करत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल, याची मला कल्पना नव्हती. 20 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस असतो, वाढदिवसाला तिला बाहेर घेऊन जाणार होते. पण त्यापूर्वीच आम्हाला सोडून गेली.दरम्यान, शाळा प्रशासनाने चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीचा अहवाल दिल्ली पोलिसांकडे सादर करणार आहोत.

Web Title: Mama I love you girl student scribbled on palm before suicide


संबंधित बातम्या

Saam TV Live