मामाच्या गावाला वाय-फाय हवा! फिरायला रिसॉर्टवर जात असाल तर ही बातमी पाहाच...

साम टीव्ही
मंगळवार, 16 मार्च 2021

मामाच्या गावी वाय-फायची कनेक्टिव्हिटी
रिसॉर्टवर पर्यटकांकडून इंटरनेटची मागणी
सुट्टीसोबत ऑनलाईन शाळा, मिटिंगचा प्लॅन

 

 

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे सगळ्यांनाच वेध लागलेत. यावेळी उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांसाठी रिसॉर्टवर जाताना वाय-फाय कनेक्टिव्हिटी आहे की नाही याची चौकशी केली जातेय

उन्हाळा सुरु झालाय. मुंबई-पुण्याकडील शहरी मंडळींना सुट्टीचे वेध लागलेत. गेल्यावर्षीचा कोरोना आणि आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर कोकणातल्या निवांत रिसॉर्टवर आताच बुकिंगसाठी चौकशीचे फोन येतायत. रिसॉर्टवर मुलभूत सोईसुविधांसोबतच इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का?... ब्रॉडबँण्डचा स्पीड किती अशा स्वरुपाची चौकशी होतेय.

 यंदा उन्हाळ्यातही ऑनलाईन शाळा सुरु असण्याची शक्यता आहे. शिवाय ऑफिसचं कामही वर्क फ्रॉम होम आहे. त्यामुळं पर्यटकही आवर्जून इंटरनेटच्या उपलब्धतेबाबत चौकशी करतायत.

 कोरोनाच्या भीतीमुळं पर्यटक बंगले किंवा घरच आठवडा किंवा पंधरा दिवस भाड्यानं घेताना दिसतायत. पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देत कोकणी माणूसही पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार झालाय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live