नंदीग्राममध्ये सुवेंदू; पश्चिम बंगालमध्ये मात्र ममताच 'अधिकारी'!

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

सुरुवातीला तृणमूलच्या Trinamool Congress नेत्या व पश्चीम बंगालच्या West Bengal मुख्यमंत्री ममता Mamata Banerjee नंदीग्राममधून विजय झाल्याचे वृत्तसंस्थांनी जाहीर केले. नंतर मात्र या मतदारसंघात भाजपचे सुवेंदू अधिकारी विजयी झाल्याचे सांगण्यात आले.

कोलकत्ता : सुरुवातीला तृणमूलच्या Trinamool Congress नेत्या व पश्चीम बंगालच्या West Bengal मुख्यमंत्री ममता Mamata Banerjee नंदीग्राममधून विजय झाल्याचे वृत्तसंस्थांनी जाहीर केले. नंतर मात्र या मतदारसंघात भाजपचे सुवेंदू अधिकारी विजयी झाल्याचे सांगण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी हा निकाल मान्य केला. मात्र, या निकालात काही गडबड असल्याचे सांगत आपण याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Mamata Banerjee Accepts Defeat in Nandigram

सायंकाळी उशीरा सुवेंदू अधिकारी Suvendu Adhikari १६२२ मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात आले. काही कमवायचे असल्यास काही गमवावे लागते, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव मान्य केला. पश्चीम बंगालमध्ये सध्या तृणमूल २१५ तर भाजप ७५ जागांवर आघाडीवर आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे.

गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे मोठ्या सभा घेतल्या. भाजपने निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते फोडून ममता बॅनर्जींना धक्का देण्याचा प्रयत्न केला. Mamata Banerjee Accepts Defeat in Nandigram

मात्र, निवडणुकी दरम्यान जखमी झालेल्या ममता बॅनर्जींनी व्हीलचेअरवर बसून राज्य पिंजून काढले व भाजपला रोखले. नंदीग्राममध्ये अटीतटीची लढत होती. एका क्षणी ममता बॅनर्जी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, नंतर सुवेंदू अधिकारी विजयी झाल्याचे सांगण्यात आले. 

याच नंदीग्राम Nandigram मतदारसंघानं ममता बॅनर्जींना २०११ मध्ये विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे मोठ्या सभा घेतल्या. Mamata Banerjee Accepts Defeat in Nandigram

भाजपने निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते फोडून ममता बॅनर्जींना धक्का देण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत. यावेळी पश्चिम बंगालमधली जनता पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या सोपवेल हे आता स्पष्ट झाले आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live