ममतांचा २०२४ साठी पॉवर गेम; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

बंगालमध्ये सत्तास्थापनेला वेग आला असून ममतांची तृणमूलच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आता त्या उद्या म्हणजे पाच मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यासाठी विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून सुव्रत मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे

स्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एकटी काही करू शकत नाही पण आपण सगळे मिळून २०२४ मध्ये भाजपचा सफाया करू शकतो, मी सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे पण सध्या मात्र कोरोनाशी दोन हात करण्यावर माझा भर असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. Mamata Banjerjee To Take oath Tomorrow as Chief Minister of West Bengal

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममतांनी माध्यमांशी संवाद साधला. दुसरीकडे बंगालमध्ये सत्तास्थापनेला वेग आला असून ममतांची तृणमूलच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आता त्या उद्या म्हणजे पाच मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यासाठी विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून सुव्रत मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. ममतांनी काल सायंकाळीच राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली. 

नंदीग्राममधील मतांच्या कथित हेराफेरीवरून देखील त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याला जिवाचा धोका असल्यानेच त्याने फेरमतमोजणी घेण्याचे आदेश दिले नाही, असेही ममता यांनी स्पष्ट केले. येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा १९०० मतांनी पराभव केला होता. Mamata Banjerjee To Take oath Tomorrow as Chief Minister of West Bengal

अचानक चित्र बदलले
आमच्या जिवाला धोका असल्यानेच आम्ही फेर मतमोजणी घेण्याचे आदेश देऊ शकलो नाही, असे निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनीच मला सांगितल्याचे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाचे सर्व्हर चार तास बंद होते, याच काळामध्ये राज्यपालांनी विजयाबद्दल माझे अभिनंदन देखील केले पण नंतर मात्र काही क्षणांत चित्र बदलल्याचे ममतांनी नमूद केले.

ममता म्हणाल्या
जनतेने शांत राहावे, केंद्रीय दलांकडून छळ
आता आमचा संघर्ष कोरोनाच्या विरोधात
केंद्राने लसीकरणासाठी ३० हजार कोटी द्यावेत
केवळ दोन ते तीन राज्यांनाच केंद्राची मदत
राज्यातील हिंसाचारास भाजपचीच चिथावणी
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live