व्हिडिओ कॉल करुन तरुणीला गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबईः एका युवतीला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. फय्याज अहमद (वय 26) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या महिलेचा मोबाइन फोन वापरला आहे, असे तपासादरम्यान पुढे आले आहे.

मुंबईः एका युवतीला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. फय्याज अहमद (वय 26) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या महिलेचा मोबाइन फोन वापरला आहे, असे तपासादरम्यान पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याद अहमद याने युवतीला मध्यरात्री व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल करून तो गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे युवतीच्या लक्षात आले. यामुळे तिने तत्काळ मोबाईल बंद केला. काही वेळानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल आला, यावेळी तिने आईला हा कॉल दाखवला. दोघींनी मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. या घटनेचा तत्काळ तपास सुरू केल्यानंतर या मोबाईलचे लोकेशन बोरीवलीमध्ये होते. तपासादरम्यान मोबाईल शरीरविक्रीय करणाऱया महिलेकडे असल्याचे समजले. या महिलेला त्या अश्लील व्हिडिओ कॉलबद्दल विचारले असता तिने एका ग्राहकाने आपल्या मोबाइलवरुन हा कॉल केल्याचे सांगितले. पत्नीला फोन करायचा आहे असे सांगून, त्याने आपल्याकडून फोन घेतला होता. पण त्याच्या अश्लील कृती पाहून आपण लगेच त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला होता.'

अहमद याला या एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे वडिल फॅशन डिझायनर महिलेसाठी ड्रेस शिवण्याचे काम करायचे. काहीवेळा तिची मुलगी हे ड्रेस आणण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपीने युवतीला पाहिले होते.

Web Title: man held for showing private parts to woman on video call at mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live