बेलापूरची सुभेदारी आमदार मंदा म्हात्रेंना

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई : शिवसेना आणि भाजप महायुतीच्या जागावाटपावरून ताणल्या गेलेल्या विधानसभेच्या बेलापूर जागेच्या निकालाने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. मात्र, या जागेवर अखेरच्या क्षणी २०१४ च्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनाच भाजपच्या वरिष्ठांनी पुन्हा संधी दिली आहे; तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

नवी मुंबई : शिवसेना आणि भाजप महायुतीच्या जागावाटपावरून ताणल्या गेलेल्या विधानसभेच्या बेलापूर जागेच्या निकालाने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. मात्र, या जागेवर अखेरच्या क्षणी २०१४ च्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनाच भाजपच्या वरिष्ठांनी पुन्हा संधी दिली आहे; तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

बेलापूरच्या जागेचा तिढा सुटल्याने म्हात्रे गुरुवारी (ता.३) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संदीप नाईकही त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने नवी मुंबईत खऱ्या अर्थाने गुरुवारपासून राजकीय धुळवडीला सुरुवात होणार आहे. जागावाटपांचा फॉर्म्युला निश्‍चित झाल्यानंतरही केवळ बेलापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये गेले दोन दिवस संबंध ताणले गेले होते. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय गोटात वादळापूर्वीची शांतता पसरली होती. बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा केल्यामुळे भाजपमध्ये आलेले गणेश नाईक आणि स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीवरून पेचप्रसंग निर्माण झाला होता. बेलापूरच्या जागेवरून कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने, गेले दोन दिवस बड्या नेत्यांच्या चर्चांच्या फैरी झडत होत्या. 

भाजपचे दोन नेते नाईकांची बाजू मांडत होते. शिवसेनेतून नाहटांनाच किल्ला लढवायला लागला होता. या दोघांच्या शर्यतीत मंदा म्हात्रे याही अग्रस्थानी होत्या. मात्र, भाजपतर्फे पुन्हा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवून उमेदवारी घोषित करण्यात आली. समाजमाध्यमांवरील चर्चेतदेखील आता म्हात्रें यांच्या समर्थकांनी आघाडी घेतली आहे. 

शिवसेनेत आसू आणि हसू
शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे बेलापूरच्या उमेदवारीच्या तयारीत होते. मात्र, ऐनवेळेला ही जागा पहिली गणेश नाईकांना गेल्याचे सूत्रांकडून समजल्यानंतर शिवसेनेच्या तब्बल २०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले; परंतु दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय चौगुले गटातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला होता. म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाहटा समर्थकांमध्ये शांतता पसरली होती. तर चौगुले गटात उत्साहाचे वातावरण होते. स्वतः चौगुले यांनी दुपारी मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत अभिनंदन केले. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपच्या सर्व नेतेमंडळींनी माझ्यावर विश्‍वास दाखवून पुन्हा लढायची संधी दिल्याबद्दल आभार. पुन्हा उमेदवारी मिळाल्याने नवी मुंबईच्या विकासासाठी कटिबद्धता सिद्ध करीन.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर.

शिवसेनेत कोणी नाराज नाहीत. तसेच शिवसेनेचा कोणताही नगरसेवक व पदाधिकारी नाराज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईच्या शिवसैनिकावर दिलेली जबाबदारी तो नेटाने पार पाडेल. स्वतःला नाराज म्हणवणाऱ्यांची नाराजी वेगळी आहे.
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, शिवसेना.
 

Web Title: Manda Mhatre candidate from Belapur


संबंधित बातम्या

Saam TV Live