मनसुख हिरेन हत्या प्रकरण - API सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

Sunil Mane
Sunil Mane

मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी पोलिस Police सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेला NIAनं अटक केली आहे. या पूर्वी या प्रकरणात सचिन वाजे Sachin Waze आणि रियाज काझी यांना NIA नं अटक केली होती पोलिसांची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली होती. Mansukh Hiren Murder case API Sunil Mane Dismissed from Police Department 

हे देखिल पहा

काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला होते. सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. Mansukh Hiren Murder case API Sunil Mane Dismissed from Police Department 

त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्यांनी मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. त्यानुसार, एनआयएच्या पथकाने माने यांना रेती बंदर येथे नेऊन त्याठिकाणी शोध मोहिम राबवली होती.
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com