कोरोना मृतांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी मंत्रजप व हवन कार्यक्रम

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 21 मे 2021

कोरोनाने मृत पावलेल्या मृतांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी सर्व समाज मोक्षधाम समितीच्या वतीने मंत्रजप व हवन कार्यक्रम गोंदिया शहरातील मोक्षधाम (स्मशानघाट) येथील महाकाल मंदिरात करण्यात आला आहे.

गोंदिया - देशात कोरोनाचे Corona थैमान वाढले असून ह्या कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक लोक आपापल्या परिने प्रयत्नशील झाले आहेत. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा व पोलीस सर्वच जण या लढ्यात आपले योगदान देत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणुन कोरोनाने मृत Death पावलेल्या मृतांच्या आत्माला Soul शांती Peace मिळण्यासाठी गोंदियात सर्व समाज मोक्षधाम समितीच्या वतीने मंत्रजप Mantra Chanting व हवन Havan कार्यक्रम Program गोंदिया शहरातील मोक्षधाम (स्मशानघाट) येथील महाकाल मंदिरात करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या समूळ विनाशासाठी पूजा हवनानंतर हवनचे शहर भर भ्रमण करण्यात आले आहे. गोंदियामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला असून यात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. अनेक लोकांचा जीव तड़फडून गेला आहे.

95 वर्षीच्या आजीबाईने इच्छाशक्तीच्या बळावर केली कोरोनावर मात

त्या सर्व कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकांच्या आत्माला शांती मिळावी तसेच कोरोनाचा अवघ्या जगातुन नाश व्हावा यासाठी शहरातील मोक्षधाम (स्मशानघाट) येथील महाकाल मंदिरात हवन व मंत्रजप कार्यक्रम करण्यात आला आहे.

हवन संपल्या नंतर त्या हवनाचे शहरभर भ्रमण ही करण्यात आले आहे. ह्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही भाग घेतला होता. 


संबंधित बातम्या

Saam TV Live