डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तु जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळल्या, कारण...

साम टीव्ही
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सर्वसामन्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तु जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आल्यात.

सर्वसामन्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तु जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आल्यात. त्यामुळे या वस्तुंच्या उत्पादन, पुरवठा आणि दरांवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. संसदेत आज जीवनावश्यक वस्तू सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामुळे कृषी सुधारणेसोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आलाय. शिवाय अन्नधान्य व्यवसायात खासगी गुंतवणूक वाढेल असाही सरकारचा अंदाज आहे. कोरोनाची परिस्थिती अधिकाधीक बिकट होत असताना आता, या वस्तुंना जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आल्याने सामन्यांवर त्याचा कसा आणि काय परिणाम होईल, ते सांगता येत नाही.

 

नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु होणार, वाचा सविस्तर

या सुधारणा विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत वाचा -

  • जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 मध्ये सर्वप्रथम मंजूर करण्यात आला.
  • या कायद्याच्या आधारे सरकार जीवनावश्यक वस्तुंच्या उत्पादन, पुरवठा आणि दरावर नियंत्रण ठेवते
  • जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार होऊ नये, यासाठीच्या उपाययोजनांचा या कायद्यात समावेश
  • नव्या सुधारणा विधेयकामुळे डाळी, कडधान्य, खाद्यतेल, तेलबिया आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तुंवरचं सरकारी नियंत्रण उठणार

संबंधित बातम्या

Saam TV Live