आधीच कोरोनाचे संकट; त्यात राज्याला अवकाळी पावसाचा फटका

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाचे संकट घोंघावत असताना आणि संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागण्याची टांगती तलवार असताना दुसरीकडे निसर्गही कोपला आहे. राज्याच्या विविध भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका बसला. त्यामुळे आधीच बेजार असलेला बळीराजा पुरता हैराण झाला आहे. 

मुंबई : राज्यात Maharashtra कोरोनाचे Corona संकट घोंघावत असताना आणि संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन Lock Down लागण्याची टांगती तलवार असताना दुसरीकडे निसर्गही कोपला आहे. राज्याच्या विविध भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाचा Rains आणि गारपीटीचा फटका बसला. त्यामुळे आधीच बेजार असलेला बळीराजा पुरता हैराण झाला आहे. Many Parts of the State witness Nonseasonal Rainfall

साम टिव्हीच्या Saam TV विविध ठिकाणच्या बातमीदारांकडून आलेली ही पावसाची माहिती- 

सिंधुदुर्गात Sindhudurg आज  सायंकाळी ६ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची Rains जोरदार बॅटिंग केली. दुपार पासून गरमीचे प्रमाण अधिकच वाढले होते. त्यानंतर सायंकाळी  ढग भरून आले असून त्यांनतर जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काजू आंबा शेतकरी अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

सोलापुरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

सोलापूर Solapur शहरात मागच्या पंधरा दिवसांपासून तापमान चाळीस अंश सेल्सियस पर्यंत जातं होत. मात्र आज संध्याकाळी मेघगर्जनेसह सोलापुरात पावसाने जोरदार आगमन केलं.सोलापुरातील सात रस्ता,जुना एम्प्लॉयमेंट चौक,कोंतम चौक,जुळे सोलापूर,लष्कर,होटगीरोड,हुडको,मोदीखाना या ठिकाणी पाऊस भरपूर कोसळला.  मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विजांच्या कडकडाटामुळे शहरातील वीज डीपीचा ट्रान्स्फार्मर सुद्धा जळाला. तर दमानी नगर परिसरातील क्रांती नगर झोपडपट्टीत लोकांच्या घरासमोरून तुडुंब पाणी वहात होते. तर जिल्ह्यातील मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यातील कांही गावात ही वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोलापुरात अचानक आलेल्या या जोरदार पावसाने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गारवा दिला आहे. Many Parts of the State witness Nonseasonal Rainfall

वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

वाशिम Washim जिल्ह्यातील वाई,वारला, पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला आहे.तर सायंकाळच्या सुमारास मानोरा तालुक्यात जोरदार पावसाल  सुरुवात झाली आहे. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतात उभ्या असलेल्या उन्हाळी,भुईमूग, मूग,तसेच भाजीपाला पिकांचं नुकसान होणार असल्याने बळीराज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात गारपीट

नांदेड Nanded जिल्ह्य़ातील काही भागात पुन्हा आज गारपिटीसह  अवकाळी पाऊस झाला. किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात मोठी गारपीट झाली. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी चारच्या सुमारास अनेक भागात गारपीट अवकाळी पाऊस झाला. या गारपिट, अवकाळी मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उन्हाळी ज्वारी, सोयाबीन पिकांना मोठा फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे तर फळबाग आणि भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. Many Parts of the State witness Nonseasonal Rainfall

यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस
यवतमाळ Yamatmal जिल्ह्यात उमरखेड , पांढरकवडा तालुक्यात  अवकाळी पाऊस पडला आहे. दुपारच्या वेळेस  या परिसरात चांगलाच पाऊस बरसला परिसरात काही ठिकाणी विजेच्या कडकडाट सह जोरदार पाऊस पडला .. सध्या शेतात ज्वारी, तीळ, टरबूज  या पिकांना फटका बसला आहे. आणि  या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त भुईमूंग आणि आंब्याला बसणार आहे . या पावसाने ज्वारीची कणसे काळी पडण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला त्यात रब्बी पिकावर आणि उन्हाळी पिकांवर त्यांची भिस्त होती.  मात्र, आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगला अडचणीत आला आहे.

जालना जिल्ह्यात वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू

जालना जिल्ह्यातही अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या ह्या पावसाने नागरिकांची ही धावपळ झाली.,दुपारी च्या 4 च्या सुमारास आलेल्या या अवकाळी पावसाने भोकरदन,बदनापूर,जालना तालुक्यात  अनेक परिसरात रिमझिम स्वरूपात हजेरील लावल्याने हवेत चांगला गारवा निर्माण झाला,या अवकाळी पावसात वीज पडून दोन म्हशींचा ही मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सेरमुलकी गावातील शेतकरी दादाराव गाडेकर यांच्या दोन म्हशींचा मृत्यू झाला. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live