परभणी जिल्ह्यात पोलिस दलातील ११२ अधिकारी-कर्मचारी कोरोनाग्रस्त

राजेश काटकर
गुरुवार, 15 एप्रिल 2021

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून काल एका दिवसात तब्बल 1172 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा Corona उद्रेक सुरूच असून काल एका दिवसात तब्बल ११७२ पॉजिटीव्ह Positive रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाविरूध्दच्या सुरू असलेल्या या लढाईत अहोरात्र परिश्रम करणार्‍या पोलिस Police दलातील अधिकारी - कर्मचार्‍यांना ही आता या कोरोनाच्या विळख्याने आपल्या तावडीत घेतले  आहे. Many Police officers in Parbhani found Corona Positive

परभणी जिल्ह्यात तब्बल ११२ पोलीस अधिकारी - कर्मचारी कोविड- पॉजिटीव्ह झाले असून, काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर काही होम कोरंटाइन आहेत. त्यात १६ अधिकारी, तर ८६ पोलिस कर्मचारी आणि १० होमगार्डचा समावेश आहे. जिल्हा पोलिस दलातील २ कर्मचार्‍यांचा काल कोरोनाने मृत्यू ही झाला आहे.

त्यामुळे पोलिस दल हादरले आहे. एकीकडे अधिकारी - कर्मचारी योध्दे एकापाठोपाठ एक घायाळ होत आहेत. त्यातच ही संख्यासुध्दा चिंता करणारी ठरली आहे. आतापर्यंत ६ कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अश्या विपरीत परिस्थितीतही ही कर्तव्य बजावण्यात देशाचे हे सच्चे हिरो काडीमात्र कमी पडत नाहीत हे गौरवास्पद आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live