पूजा चव्हाण प्रकरणी अनेक सवाल अनुत्तरित

SAAM TV
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दररोज वेगवेगळे गौप्यस्फोट होतायत. परिणामी तपासावर संशय व्यक्त केला जातोय. पाहूयात एक विशेष रिपोर्ट.

 

गेल्या तीन आठवड्यांपासून गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी एका मंत्र्यावर आरोप होतायत. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केलीय. 

या प्रकरणी यवतमाळ, पुणे आणि बीड जिल्ह्यातील परळी अशा तीन ठिकाणांती पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणाहून दररोज नवनवी माहिती समोर येत असल्याने संभ्रम वाढलाय. त्यातच पोलिसांच्या भूमिकेमुळेही तपासावर संशय निर्माण झालाय.

या प्रकरणी पूजा चव्हाण यांचे कुटुंबिय किंवा इतर कोणाचीही तक्रार नसल्याने चौकशीला वेग येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. वरिष्ठांकडून गुन्ह्याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने अकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पोलिसांनी नेमका काय तपास केला? याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने तपासाभोवतीचा संशय आणखीनच वाढलाय. 

हेमंत नगराळे, पोलिस महासंचालक

फक्त पोलिसच नव्हे तर राजकीय स्तरावरही या प्रकरणावरून गोंधळ दिसतोय. शिवसेनेच्या मंत्र्यावर आरोप होत असल्याने महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांचे नेतेही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया देतायत. त्यामुळे कुठे तरी नक्कीच पाणी मुरतंय, असा संशय बळावलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live