मोटरमनने ताबा घेताच, लोकल जाऊन धडकली..!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 मार्च 2020

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बफरवर लोकल धडकली; मात्र या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. सोमवारी (ता. २) दुपारी फलाट क्रमांक ३ वरून अंबरनाथ लोकल रवाना होत असताना हा अपघात झाला. त्या वेळी झालेल्या आवाजामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

सोमवारी दुपारी ४.१३ वाजताची सीएसएमटी-अंबरनाथ धीमी लोकल फलाट क्रमांक ३ वर लागली होती. मोटरमनने ताबा घेतल्यानंतर अचानक लोकल पुढे सरकली आणि फलाटाच्या टोकाला असलेल्या बफरला धडकली; परंतु मोटरमनने लगेच लोकलवर नियंत्रण मिळवले. नंतर ही लोकल अंबरनाथकडे रवाना झाली, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशी होणार
लोकल बफरला धडकल्यामुळे मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नेमके काय झाले, हे पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. अखेरीस रेल्वे अधिकारी, आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी आवाहन केल्यानंतर प्रवासी पांगले. या दुर्घटनेत बफरचे किरकोळ नुकसान झाले. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकार्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marahi news as the motorman took contol the local pushed on...

संबंधित बातम्या

Saam TV Live