संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 मार्च 2019

बारामती : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळी केली. तसेच उस्मानाबादमधून माजी मंत्री राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संजय शिंदे हे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिंदे आणि मोहिते या घराण्यात पारंपरिक राजकीय स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे मोहितेंशी त्यांचा सामना होणार आहे. बारामतीत आज मोठ्या संख्य़ेने समर्थकांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उस्मानाबादसाठी जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता औरंगाबादची जागा ही काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, उस्मानाबादेतून जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचा सामना आता शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याशी होणार आहे.

Web Title: Sanjay Shinde Gets Candidacy for Madha From NCP

संबंधित बातम्या

Saam TV Live