'सोनसळचा वाघ' 4 वाजता होणार अनंतात विलीन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी (ता. 10) 4 वाजता सांगली जिल्ह्यातील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

पुणे: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी (ता. 10) 4 वाजता सांगली जिल्ह्यातील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

पतंगराव मूळ खानापूर तालुक्‍यातील सोनसळ गावचे. समर्थक त्यांना "सोनसळचा वाघ' म्हणत. पतंगरावांनी आपल्या दुष्काळी भागाचा कायापालट केला. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले. त्यात दुष्काळी भागातील हजारो मुलांनी शिक्षण घेतले. तालुक्‍यांचे विभाजन करुन कडेगाव आणि पलूस या तालुक्‍यांची निर्मिती केली. वांगी येथे सोनहिरा साखर कारखाना उभा केला. त्या कारखान्याच्या कार्यस्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

शनिवारी सकाळी 7 ते 9 यावेळेत त्यांच्या "सिंहगड बंगला' या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. 10.30 ते 11.30 यावेळेत धनकवडी येथील भारती विद्यापीठात पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव कडेगावला नेण्यात येईल. वांगी येथे 4 वाजता अंत्यसंस्कार होतील. 


संबंधित बातम्या

Saam TV Live