काँग्रेसला आता दुर्बिणीतून शोधावं लागेल : अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर आज (शनिवार) निशाणा साधला.

मध्य प्रदेशातील मोरेना येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहा बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आज झालेल्या सभेत अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, ''राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे. काँग्रेस पक्ष खोटं बोलण्याचे एटीएम बनले आहे''. तसेच अन्यायाविरोधात लढण्याचे मोरेना येथील लोकांच्या राहणीमानात आता आले आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live