भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात विरोधकांची घोषणाबाजी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर आमदार यावेळी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली नाही, या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. राज्य सरकारची धोरणे चुकीची असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी विधीमंडळात सादर करण्यात आला. या अहवालातील आकडेवारी बोगस असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एबीपी माझा' वाहिनीशी बोलताना सांगितले. 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी मुंबईत सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे.

Web Title : BJP-Shiv Sena coalition government's slogan against opposition

संबंधित बातम्या

Saam TV Live