येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जुलै 2018

येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे परिसरात सुद्धा काही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली असून शहरातील काही सखल भागात पाणी  साचले आहे. तसेच, पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे. तर लोकल सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लोकल गाड्या काहीशा उशिराने धावत आहेत.

उद्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 3 जुलै रोजी मुंबईत 75.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून उपनगरात 131.4 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live