जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन सुरु 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल शासन सुरु झालंय.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपाने मंगळवारी पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले. राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्याने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राज्यपाल राजवट असेल. जम्मू काश्मीरला कलम 370 अंतर्गत विशेष दर्जा असल्याने तिथे इतर राज्यांसह राष्ट्रपती राजवट लागू होत नाही. दरम्यान सहा महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर विधानसभा भंग करुन पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live