Priyanka Gandhi यांची मेगारोडशो मधून राजकारण शाही एन्ट्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधींची आज मेगारोडशो मधून राजकारण शाही एन्ट्री होणारे. उत्तर प्रदेशमध्ये केल्या जाणाऱ्या या रोड शोची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचं कळतंय. राहुल गांधी यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंदिया हे देखील या रोडशोमध्ये सहभागी होणारे. 

लखनौमध्ये आज काँग्रेसकडून मेगारोड शोमधून शक्तीप्रदर्शन केलं जाणारे. या मेगारोडशोनंतर प्रियंका गांधीचा पुढील चार दिवस भरगच्च कार्यक्रम आखण्यात आलाय. यामध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठका, विविध ठिकाणी 

दरम्यान, प्रियंका गांधीच्या रोडशोच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय. प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात पोस्टरबाजी सुरू आहे. आधी राहुल गांधींना रामाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावणाच्या अवतारात एका पोस्टरवर दाखवण्यात आलं होतं. यात भर म्हणून आता प्रियांका गांधींना दुर्गा देवीचा अवतार दाखवण्यात आलाय. 

लखनौच्या एका चौकात दुर्गादेवीचा अवतार असलेल्या प्रियंका गांधींचं उत्तर प्रदेशात स्वागत अशा आशयाचा बॅनर झळकावण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपूर्वी पासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे वेगवेगळ्या देवी-देवतांचे अवतार असल्याची पोस्टर बाजी सुरू करण्यात आलीय.

WebTitle : mararthi news priyanka gandhi to start her political career with mega road show from uttar pradesh

संबंधित बातम्या

Saam TV Live