केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री आणि दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री आणि दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

बंगळूरूतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी 9 नंतर बंगळूरुतील नॅशनल कॉलेजच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्येही उपचार करण्यात आले होते.

दक्षिण बंगळूर लोकसभा मतदार संघातून गेल्या 22 वर्षांपासून ते निवडून येत होते. केंद्रातील भाजप सरकारमधील विश्वासू मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा होती. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांना सुरवातीला रासायनिक व खते मंत्रालय देण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2016 पासून ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहत होते. मोदी सरकारमधील निधन झालेले हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी गोपीनाथ मुंडे, अनिल दवे आणि आता अनंत कुमार यांचे निधन झाले आहे.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, की केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने देशाला विशेष करून कर्नाटकच्या नागरिकांसाठी मोठा झटका आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की माझा सहकारी आणि मित्र अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ते एक चांगले नेते होते. तरुणपणात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अत्यंत कष्ट करत ते नागरिकांची सेवा करत राहिले. त्यांना कायम त्यांच्या चांगल्या कामासाठी लक्षात ठेवले जाईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live