क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख शंकरराव गडाख यांच्या शोधासाठी जिल्हा पोलिस दलाची धावपळ सुरु ​

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

नगर : क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख व नेवासेचे माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक करुन आज (ता.16) हजर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना बजावले आहेत. त्यामुळे सकाळपासून गडाख यांच्या शोधासाठी जिल्हा पोलिस दलाची धावपळ सुरु आहे.

गडाख यांच्या सोनई व शिंगणापूर (ता. नेवासे) येथील संभाव्य ठिकाणी व नगरमधील यशवंत कॉलनीमधील घरी त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळीच पोलिस पथके पोचली. मात्र, पोलिसांना दुपारपर्यंत गडाख यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथे केलेल्या चक्काजाम आंदोलन प्रकरणी नेवासे न्यायालयाने काल (ता. 15) गडाख यांना पकड वॉरंट बजावलेले आहे. त्यांना आजच (ता. 16) न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिस ठाण्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाची सकाळपासून गडाख यांच्या सर्व संभाव्य ठिकाणी शोधाशोध सुरु आहे.

जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनाही अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांची सकाळपासून धावपळ सुरु आहे. शिंगणापूर येथे जवळपास दोनशे पोलिसांचा फौजफाटा गडाख यांचा शोध घेत आहे. 

Web Title: Nagar Police searching for Shankarrao Gadakh to arrest

संबंधित बातम्या

Saam TV Live