यंदाचा गोविंदा कोरडाच...

यंदाचा गोविंदा कोरडाच...

मुंबई - गोविंदाच्या जोडीला वाद्यवृंद, नाशिक ढोल आदी पथकेही सज्ज असून, सकाळपासून सुरू होणारा हा उत्सव रात्री उशिरापर्यंत उत्तरोत्तर रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परिणामी, हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगराला लागलेले दहीहंडीचे वेध आज संपणार असून, ठिकठिकाणी बांधण्यात येत असलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा रस्त्यावर उतरणार आहेत. 

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, येत्या २४ तासांत पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण पूर्व राजस्थान, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहील. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी, कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.   मोनोरेल गाइड वे बीम्सच्या दोन्ही बाजूकडून अधिकतम भारासह ७५० व्होल्ट डी.सी. इतक्या ट्रॅक्शन पॉवर रेल्स आहेत. गाइड वे बीम्सवरील या रेल्सच्या जवळपास लोखंडी वस्तू येणे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे मोनोच्या खांबांना हंडी बांधू नका, असे सांगत एमएमआरडीए प्रशासनाने मोनोरेल्वे मार्गाच्या सुरक्षा क्षेत्राबाबत काही सूचना केल्या असून त्यांचे पालन करावे, असे आवाहनही केले आहे. या सूचनांनुसार, मोनोरेल्वे मार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात ५.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची वाहने आणू नयेत. क्रेनच्या बूमसह क्रेनची हालचाल करू नये. पोस्टर्स फलक लावू नयेत. मोनोरेल्वे गाइड वे किंवा बांधकामावरून केबल्स वायर्स ओलांडून नेऊ नये. कुठल्याही प्रकाराचे पुतळे अथवा प्रदर्शनाची ने-आण करू नये. गाइड वे बीमच्या आसपास दहीहंडी उभारून मोनोरेल्वेच्या सुरक्षेला धोका पोहोचवू नये, असे स्पष्ट केले आहे. याचे पालन न केल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.


Web Title: Dahi handi fervour grips in mumbai but no rainfall
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com