‘एमपीएससी’ परीक्षेचा तिढा कायम, तर आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात

साम
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून,  मराठा क्रांती ठोक मोर्च्यात्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात करण्यात येतेय. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाही. तोपर्यंत हा एल्गार थांबणार नाही, असाही इशारा देण्यात आला.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून,  मराठा क्रांती ठोक मोर्च्यात्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात करण्यात येतेय. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाही. तोपर्यंत हा एल्गार थांबणार नाही, असाही इशारा देण्यात आला. तुळजापुरमधील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा  महाद्वाराजवळ आल्यानंतर जागरण गोंधळ घालून सभा घेतली जाईल. या आंदोलनात एक लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून. खासदार संभाजीराजेही उपस्थित राहणार आहेत. रविवारी होणारी MPSC परीक्षा उधळून लावू, परीक्षा होऊ देणार नाही असा ठोक मोर्चाकडून इशारा देण्यात आलाय.

मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मराठा नेते सुरेश पाटलांनी दिली.

दरम्यान, येत्या ११ तारखेला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घ्यायची की नाही, याचा तिढा अजून कायम आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल देईपर्यंत ही परीक्षा न घेण्याच्या मागणीचा मराठा संघटनांच्या नेत्यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस निर्णय जाहीर केला नाही.  एमपीएससी’च्या २०० जागांसाठी येत्या ११ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live