आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडकणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत युती सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शिलेदार सोमवारी (ता. 26) मंत्रालयावर धडकणार आहेत.

ठाणे : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत युती सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शिलेदार सोमवारी (ता. 26) मंत्रालयावर धडकणार आहेत.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावरून या मोर्चाला सुरवात होणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजाने आजवर राज्यभरात 58 मूक मोर्चे आणि दोन ठोक मोर्चे काढले. त्यानंतर सरकारने विविध योजनांसह आरक्षण दिले. मात्र, याचा कुठलाही फायदा मराठा समाजातील तरुणांना झालेला नाही. याउलट 2014 पासून मराठा समाजातील तरुण शिक्षण व नोकरीतून हद्दपार होताना दिसत आहे.

आजवर सरकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या; परंतु, सरकारच्या उपसमितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. दरम्यान, यावर दोन दिवसांत तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या वेळी सकल मराठा मोर्चाचे समन्वयकदेखील उपस्थित होते. 

काय आहेत मागण्या? -
आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, 2014च्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्‍त्या द्याव्यात, 72 हजार मेगाभरती व एमपीएससीतील विद्यार्थ्यांना नियुक्‍त्या द्याव्यात, पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, नरेंद्र पाटील यांना तत्काळ निलंबित करा किंवा महामंडळ बरखास्त करा, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन करणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.

Web Title: Maratha Kranti Thok Morcha will be hit the mintralaya today
 
संबंधित बातम्या

Saam TV Live