मराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही

modi 1.jpg
modi 1.jpg

वृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यासह मराठा आरक्षण विषयक एक शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची भेट घेतली. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपल्या शिष्टमंडळासह सकाळी 10 वाजताच पंतप्रधाना यांच्या निवासस्थानी पोहचले होते. तब्बल 2 तास ही बैठक सुरू होती.  (Maratha reservation The Prime Minister listened but there is no assurance) 

यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील प्रमुख विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत मोदींना पत्रही देण्यात आली आहेत. पंतप्रधानांसामोर जे विषय मांडले  ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले. तसेच यासर्व विषयांमध्ये ते लक्ष घालणार असल्याचे त्यांनी म्हटल आहे.  

मोदी – ठाकरे यांच्यात १० विषयांवर झाली चर्चा.
- मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल 
- इतर मागासवर्गीयांचे पंचायत राजमधील राजकीय आरक्षण
- मेट्रो कारशेडसाठी कंजूर मार्ग येथे जागेची उपलब्धता, 
- जीएसटी (GST) 
-  पिकविम्यातील अडचणी 
-  गेल्या काही वर्ष राज्याच्या किनारपट्टी भागात जी चक्रीवादळे धडकतात त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत एनडीआरएफकडून मिळणारी भरपाई अपुरी. नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित, 
-  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.  यासाठी लागणारी कागदपत्रे आधीही दिली आहेत आणि  आणखी माहिती हवी असल्यास अजून माहिती  देण्यास तयार.  याबाबत केंद्र सरकारडून सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा.

Edited By - Anuradha Dhawade 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com