लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला....संभाजीराजेंच्या आंदोलनाची टॅगलाईन ठरली!

संभाजी थोरात
गुरुवार, 10 जून 2021

समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे.......या टॅगलाईनखाली 16 जून रोजी मराठा समाज आंदोलन करणार आहे

कोल्हापूर : समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला आणि जबाबदारी निश्चित करा! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे.......या टॅगलाईनखाली 16 जून रोजी मराठा समाज Maratha Community आंदोलन करणार आहे. Sambhaji Raje Announced Nature of Maratha Reservation Agitation

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज Chatrapati Shahu Maharaj यांच्या समाधीस्थळी सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू असेल, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje Chatrapati  यांनी आज कोल्हापुरात Kolhapur दिली. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही, आमच्याशी खेळ करु नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

हे देखिल पहा

या आंदोलनात मराठा समाज शांत बसेल मात्र लोकप्रतिनिधींना बोलावं लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 आमदार आणि 3 खासदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडावी असं संभाजीराजे यांनी घोषित केलं आहे. केवळ मतं मागायला आमच्याकडे येता का? आमच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे, जर कुणी लोकप्रतिनिधी येणार नाही त्यांच्या जागी कोरी पाटी लावली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. Sambhaji Raje Announced Nature of Maratha Reservation Agitation

सोून सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी

''आम्ही या आंदोलनाला मूक आंदोलन हे नाव दिले आहे. हे आंदोलन अभूतपूर्व असे आहे. यातून जनतेला कळेल की आपला निवडून दिलेला लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे. ते समाजासाठी इथून पुढे काय करणार, सुद्धा कळेल.  मराठा समाज हा कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर तो स्वतःच्या हक्काची लढाई लढत आहे,'' असंही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. Sambhaji Raje Announced Nature of Maratha Reservation Agitation

या आंदोलनाच्या संभाजीराजे आधी पुण्यातून 12 तारखेला कोपर्डीकडे मोठं शक्ती प्रदर्शन करत जाणार आहेत. त्यानंतर काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केलं जाणार आहे....कोल्हापूर नंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड या जिल्ह्यात अशाच पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे. या नंतर देखील सरकार मागण्या मान्य करत नसेल तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला जाणार आहे. 36 जिल्ह्यातील मराठा समाज या आंदोलनात सहभागी होईल, असा शेवटचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live