"महाभारत" बाजूला ठेवा जनतेसाठी काम करा- पंकजा - धनंजय मुंडे यांना सल्ला

 विनोद जिरे
शनिवार, 17 एप्रिल 2021

पालकमंत्र्यांनी आपापसातील "महाभारत" बाजूला ठेऊन, जनतेच्या आरोग्यासाठी "संजीवनी" देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी केले आहे

बीड : परळीसह बीड Beed जिल्ह्यात कोरोनाने Corona थैमान घातले आहे.त्यात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.बेडसाठी Bed धावाधाव होत आहे.या महामारीच्या संकटावर उपाययोजना करायच्या सोडून, बीडचे आजी माजी पालकमंत्री असणाऱ्या मुंडे- बहीण भावांमध्ये ट्वीटर वॉर सुरू आहे. या आजी माजी पालकमंत्र्यांनी आपापसातील "महाभारत" बाजूला ठेऊन, जनतेच्या आरोग्यासाठी "संजीवनी" देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी केले आहे. work for the people otherwise we will agitate

सध्या सामान्य जनता जगण्यासाठी लढत असताना, तुमच्या ट्विटर वॉरच्या फुटकळ बातम्या बघून जनसामान्य हवालदिल झाले आहेत. सध्या आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि जनतेच्या हितासाठी प्रयत्न करा. प्रत्येक वेळी रुग्ण व्हेंटिलेटर Ventilator, सी टी स्कॅन C T Scan , एक्स रे, सोनोग्राफी, इ सी जी, रक्त तपासणी, अगदी फ्रॅक्चरसाठीही अंबाजोगाई Ambajogai येथे पाठविले जातात कित्येक रुग्णांची जीवन ज्योत याच प्रवासात मालवली आहे.

हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा आणि ५०० खाटांचं कोविड सेंटर उभारणीसाठी, तुमची ताकद ठाकरे, गांधी किंवा मोदींच्याकडे खर्ची घाला. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा. अशी संतप्त भावना व्यक्त करत, मागण्या मान्य न केल्यास, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी दिला आहे..!

Edited By- Digambar jadhav

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live