फेसबुकची 'टाइमलाईन'

अनिकेत पेंडसे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आज आपल्या अशा एका मित्राचा वाढदिवस ज्यानं इंटरनेटच्या मायाजाळात भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला ! आज आपला हा मित्र 14 वर्षांचा होतोय. असा मित्र जो तुमच्या माझ्या सर्वांच्या आय़ुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. कोण आहे तो मित्र ? 

आज आपल्या अशा एका मित्राचा वाढदिवस ज्यानं इंटरनेटच्या मायाजाळात भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला ! आज आपला हा मित्र 14 वर्षांचा होतोय. असा मित्र जो तुमच्या माझ्या सर्वांच्या आय़ुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. कोण आहे तो मित्र ? 

आयुष्याच्या कोणत्याही क्षणी आपला सोबती होणारा, आपल्याला जगातली बित्तंबातमी सर्वात आधी देणारा, मोबाईलवरुन जगातल्या कुठल्याही ठिकाणी आपल्याला जोडू शकणारा, आपल्याला हसवणारा, आपलं मनोरंजन करणारा सोबती असं वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यासमोर हमखासपणे चित्र उभं राहतं ते फेसबुकचं. खरं तर गुगलला माहितीचं मायाजाल म्हटलं जातं पण हळू हळू फेसबुकनं ही प्रतिमा बदललीय. सोशल माध्यमांचा सर्वात मोठा फ्लॅटफॉर्म फेसबुकचा आज 14 वा वाढदिवस आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग एक प्रेरणा ठरलेत. 14 वर्षांपूर्वी जेव्हा मार्क झुकेरबर्ग 19 वर्षांचे होते तेव्हा हे नाव कुणालाच परिचित नव्हतं. पण फेसबुकनं मार्क झुकेरबर्गना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं. मार्क फेसबुकला आपलं अपत्य मानतात आणि म्हणूनच या खास मोक्याच्या क्षणी त्यांनी एक पोस्टही शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. आपल्या हातून झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली त्यानं या पोस्टमधून दिलीय. हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांच्या एका खोलीत २००३ साली फेसबुकचा जन्म झाला. तेव्हा त्याचा मुख्य उद्देश होता, इंटरनेटच्या माध्यमातून हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांचं आकर्षकपणासाठी रेटिंग करणं, जेणेकरून डेटिंग किंवा फ्लर्टिंगसाठी त्याचा वापर करता येईल! तिथपासनं सुरु झालेला फेसबुकचा प्रवास आज एका अजिंक्य टप्प्यावर येऊन ठेपलाय. तुम्ही जसे आहात किंवा तुम्हाला जसे हवे आहात तसे फेसबुकवर वावरू शकता, चर्चा-शेअरिंग करू शकता, एका क्लिकरसशी नव्या-जुन्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात येऊ शकता ही या माध्यमाची ताकद आहे आणि ती झुकरबर्गच्या कल्पनेतून साकारली आहे. त्यामुळेच विशिष्ट विद्यापीठापर्यंतच मर्यादित असलेलं फेसबुक हळूहळू वाढत गेलं, ते थेट इंटरनेट असलेल्या प्रत्येकापर्यंत. फेसबुक कंपनी झाली, तिचे शेअर बाजारात आले. आवाका वाढत गेला. एका संकल्पनेचं रुपांतर मल्टिबिलियन कंपनीमध्ये झालं. आज गुगला टक्कर देईल असं स्थान फेसबुकनं तयार केलंय. गुगल सर्च इंजिनला सर्वात मोठी स्पर्धा आता निर्माण झालीय ती फेसबुकच्या रुपानं. मार्केटप्लेससारख्या नवीन ऑप्शनच्याद्वारे फेसबुकनं थेट खरेदी-विक्री मार्केटमध्येही पाऊल ठेवलंय. आगामी काळात हा विस्तार वाढणार हे निश्चित.

2004 ते 2018 हा फेसबुकचा प्रवासही थक्क करणारा आहे.
 

2004 : द फेसबुकचा जन्म
2004 मध्ये हार्वड विद्यापिठाच्या हॉट ऑर नॉटचं मोठं रुप इंटरनेटवर आलं. 4 फेब्रुवारी 2004 ला द फेसबुक नावानं युसर्सना डिजिटल फोटो आणि जुजबी माहिती अपलोड करण्यासाठी याचं क्षेत्र मर्यादित होतं. 2005च्या सुरुवातीला ना द फेसबुक नावातील द हा शब्द काढण्यात आला.

2005 : फेसबुक फोटोंचा जन्म
जगातल्या 100 कोटींहून अधिक लोकांकडून फेसबुक फोटोसचा वापर केला जातो. ऑक्टोबर 2005 मध्ये फेसबुक जगातली पहिली वेबसाईट ठरली ज्यावर तुम्ही किती फोटो अपलोड करु शकता. इंटरनेटच्या भाषेत सांगायचं तर फोटो फिचरबाबत अमर्याद स्पेस देणारी फेसबुक ही पहिली साईट 2005 मध्ये ठरली. डिसेंबर 2005 मध्ये एकमेकांना टॅग करण्याची सुविधाही फेसबुकवर सुरु झाली.

2006 : ...अन् फेसबुकनं जग जिंकलं!
सप्टेंबर 2006 हा फेसबुकच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. जगभरात फेसबुकचा विस्तार झाला. जगातल्या कोणत्याही देशात 13 वर्षांच्या पुढच्या वयाची व्यक्ती या साईटचा वापर करु शकत होती. 

2007 : मोबाईलवर फेसबुक !
मोबाईलवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता फेसबुकनं जानेवारी 2007 मध्ये मोबाईलवर फेसबुक वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. टचस्क्रीन मोबाईलचा जन्म अजून व्हायचा होता. पण एसएमएस आणि एमएमएसद्वारे फेसबुकवर पोस्ट आणि फोटोस टाकण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

2008 : फेसबुकचा पुनर्जन्म
यूसर्जकडून लूकबाबच वाढत्या तक्रारी पाहता जुलै 2008 मध्ये फेसबुकचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला. सप्टेंबर 2008 मध्ये टॅब हा ऑप्शन उपलब्ध करण्यात आला. 

2009 : फेसबुककडे गंगाजळी
फेसबुकचं लाँचिंग झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतच मार्क झुकेरबर्गनं जाहीर केलं की कंपनीनं त्या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच पूर्ण वर्षाला जितका खर्च येतो इतकी कमाई केली. 3 कोटी यूसर्जचा टप्पा याच वर्षी फेसबुकनं पार केला होता.

2010 : लाईकचा ऑप्शन
2009 च्या शेवटाला लाईक हा ऑप्शन फेसबुक लाईकचं फिचर आज सर्वांना माहिती आहे पण अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की 2010 मध्ये फेसबुक कॉमेंटला लाईक हा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला. त्यापूर्वी कॉमेंटवर केवळ कॉमेंट करता येत होती.

2011 : मेसेंजरचा जन्म
2011 पूर्वी फेसबुकच्या मेसेजच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधता येत होता. मात्र याचचं मोठं स्वरुप 2011 मध्ये मेसेंजरच्या माध्यमातून जन्माला आलं. ऑगस्ट 2011 मध्ये आयओएस आणि अँड्राईड व्हर्जनसाठी फेसबुकनं मेसेंजर हे स्वतंत्र अॅप्लिकेशन तयार केलं.

2012 : आयपीओचा जन्म
अनेक विश्लेषणं आणि अफवांनंतर 12 मे 2012 ला फेसबुकच्या IPO लाँच कार्यक्रमात शेअरची रक्कम 38 डॉलर ठरवण्यात आली. नवीन लिस्टेड कंपनीमध्ये फेसबुक सर्वात वेगानं पुढं जाणारी कंपनी ठरली. 
 

2013 : हॅशटॅग मेनिआचा जन्म
एप्रिल 2012 मध्ये फेसबुकनं 100 कोटी रुपयात इन्स्टाग्राम खरेदी केली. ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी फेसबुकनं इन्स्टाग्रामचं हॅशटॅग फिचर अस्तित्वात आणलं. जून 2013 मध्ये हॅशटॅग हे फिचर आणण्यात आलं. 

2014 : आमूलाग्र फिचर्स
व्हर्चुअल रिएलिटी हे फिचर फेसबुकनं 2014 मध्ये अस्तित्वात आणलं. याच वर्षी फेसबुक वॉट्सअपशी कनेक्ट झालं.

2015 : कोटीच्या कोटी उड्डाणं
ट्विटर आणि इतर साईट्सची स्पर्धा असतानाही फेसबुकचा आवाका वाढतच होता. ऑक्टोबर 2012 ते 27 ऑगस्ट 2015 या काळात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसाला 1 कोटी इतकी झाली. 

2016 : फेसबुक लाईव्हचा जन्म
ट्विटरशी फेसबुकची स्पर्धा होती मात्र व्हिडिओच्या बाबतीत यूट्यूबकडून फेसबुकला स्पर्धा मिळत होती. त्यामुळंच फेसबूक लाईव्हचा ऑप्शन सामान्य यूसर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. ऑगस्ट 2015 ला ही सुविधा केवळ सेलिब्रिटी अकाऊंटपुरती सुरु करण्यात आली होती. अल्पावधीतच फेसबुक लाईव्ह हे फिचरही लोकप्रिय ठरलं आणि वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं. फेसबुक लाईव्हचा विविध प्रकारे वापर करण्यात आला आणि त्यामुळं यूसर्जची सर्वाधिक पसंती असणारा हा ऑप्शन ठरला. 

2017 : एआर फिचरचा जन्म
पोकेमॉन गो सारख्या ऑगमेंटेड रियालिटी  गेम्सनं फेसबुकसमोर आव्हान उभं केलं. यापूर्वी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फेसबुकवर गेम्स खेळले जात होते पण एप्रिल 2017 मध्ये फेसबुकवर एआर गेम्सचा ऑप्शन देण्यात आला. मोबाईलमधून फेसबुक ऑपरेट करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता एआर हे फिचर तातडीनं उपलब्ध करुन देण्यात आलं. 2017 डिसेंबरमध्ये हे फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं. 

आवडत्या व्यक्तीशी बोलण्य़ाची संधी उपलब्ध करुन देणारं प्लॅटफॉर्म ते निवडणुकीच्या प्रचारापर्यंत.. अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं फेसबुकचा वापर केला जातोय. 20 कोटी फेक यूजर्स फेसबुकवर असणं हेच खूप काही सांगून जातं. अजेंडे राबवण्यासाठी हे फेक यूजर्स आहेत हे वेगळं सांगायला नको. गुगललाही बहुतेक बाबतीत आता फेसबुकनं टक्कर द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेनंतर फेसबुक वापरण्यात दुसरा क्रमांक भारतीयांचाच लागतो. फेसबुक म्हणजे एक जागतिक संपर्क क्रांती… जगातल्या सर्वांना कनेक्ट करणारी, एकमेकांची सुख-दुःख शेअर करणारी सोशल नेटवर्किंग साईट..अगदी आपल्या हक्काच्या मित्रासारखी 2018 मध्ये फेसबुकवर कोणते नवीन फिचर्स उपलब्ध होतील याची उत्सुकता ताणली गेलीय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live