BLOG - एका देशभक्ताचं देशवासियांना पत्र

- सिद्धेश सावंत
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मी देशभक्त बोलतोय..

भारत माझा देश आहे.. सारे बांधव माझे भारतीय आहेत.. ही प्रतिज्ञा फक्त शाळेत म्हटली! पण खरंच असं आहे का? नाही म्हणजे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.. पण स्वातंत्र्यदिनी उफाळून येणारं आपलं देशप्रेम उरलेलं वर्षभर कुठे गायब असतं...? शाळा सुटल्यानंतर कितीदा राष्ट्रगीताला उभं राहिलात तुम्ही.. एकदा आठवून बघा.. उत्तर तुमचं तुम्हालाच द्या.. 

आपण इंडियात राहतो, एक असा इंडिया जो विकसीत आहे, विकसनशील आहे... जिथं चांगले रस्ते आहेत, वीज आहे, आरोग्य सुविधा आहेत... इंटरनेट आहे फुकटचं वायफाय आहे... 

पण या इंडियामध्येच एक असाही भारत आहे, जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाहीये..जिथे इंटरनेट तर सोडाच पण साधं मोबाईलचं नेटवर्कही पोहोचलेलं नाही.. वीज, रस्ते, किंबहुना संडासही नसणारी कितीतरी गावं आजही आहेतच. 

विविधतेत एकता आहेच आपल्या. पण आहोत का आपण सगळे एक? सर्वधर्मसमभाव आहे का आपल्या नसानसात? धर्मनिरपेक्षा हा शब्द मूल्य शिक्षण सोडलं तर कधीतरी आचरणात आणायचा प्रयत्न केलाय का आपण? 

फार निगेटीव्ह व्हायची गरज नाही असं तुम्ही म्हणाल.. चांगल्याही गोष्टी झालेल्या आहेतच आपल्या देशात, असंही हक्कानं सांगाल. बरोबरच आहे तुमचं. अगदी खरंय. पण एकदा विचार करुन बघा, विविधतेने नटलेल्या गोष्टींचा आपण खरंच अभिमान बाळगतो आहोत का, हे ही एकदा तपासून बघा!!

माझा देश आणि माझे देशबांधव ह्यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा आपण केली होती.. त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातचं माझे सौख्यं सामावलेले असल्याचंही आपण बोललो.
असं सगळं बोलून प्रतिज्ञा संपते खरी. पण इथूनच सुरु होते परिक्षा तुमच्या. नव्हे आपल्या देशभक्तीची..!

आज सिग्नल वर झेंडा विकणाऱ्यांकडे बघताय ना? आजही सुरक्षित नसणाऱ्या आपल्या देशातल्या स्रीयांकडे बघताय ना? उच्चशिक्षित असूनही रोजगारासाठी आत्महत्या करणांयांकडे बघताय ना? राज्याराज्यात.. सीमावादांत.. गलिच्छ राजकारण्यांना शिव्या देण्यापलिकडे काहीही न करणाऱ्यांकडे बघताय ना..? 

या सगळ्याकडे बघून एकमेकांना देशभक्तीच्या, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा जरुर द्या, पण एकदा शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा आपण विसरलो तर नाही ना?, या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुमच्यापुरतं जरी शोधलंत तरी खूपए..!!

संबंधित बातम्या

Saam TV Live