लग्नपत्रिका कुंडीत टाकली तर झाड उगवेल... काय आहे नेमकी संकल्पना?

लग्नपत्रिका कुंडीत टाकली तर झाड उगवेल... काय आहे नेमकी संकल्पना?

लग्न म्हटलं की पत्रिका आलीच. आजकाल विविध आकर्षक पत्रिका छापण्याचा ट्रेंड सुरु आहे. मात्र लग्न झाले की पत्रिकांचे करायचे काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. घरात पत्रिकांचे ढीग तयार होतात.  तोच विचार करत भन्नाट कल्पना घेऊन एका निसर्गप्रेमी व्यक्तीची अप्रतिम संकल्पना अनेकांना आवडली आहे. ती म्हणजे आता लग्नपत्रिका कचरा पेटीत टाकण्याऐवजी कुंडीत टाकली तर झाड उगवेल. 

वंदना जोशी या पर्यावरणप्रेमी व निसर्गाशी जोडलेल्या नवनवीन गोष्टी प्रत्येकवेळी करतात. त्यातूनच शोध काढत त्यांनी त्यांच्या मुलाच्या (प्रणव) लग्नपत्रिकेत सीड कार्डचे स्वरूप देऊन पर्यावरण पूरक विवाहाचा आदर्श राबविला आहे. 2 फेब्रुवारीला वंदना जोशी यांच्या मुलाचा विवाह आहे. या पत्रिकेची साइज सव्वासात इंच बाय पाच इंच असून एक पत्रिका नऊ-दहा रुपयाला मिळते. लग्न झाल्यावर पत्रिका फेकून न देता ती एक दोन तास पाण्यात भिजत ठेवून ती कुंडीत ठेवली तर त्यात एक सुंदर फूल झाड उगवेल. पत्रिकेसाठी लागणारे साहित्य सोलापूरमध्ये मिळत नसल्यामुळे पर्यावरणपूरक पत्रिकेसाठी लागणारे मोठे ब्लॅक शीट हे कोल्हापूरहून मागविले आहे. त्यात मिरची, टोमॅटो, तुळशी, झेंडू, गुलाब, मोगरा अशाप्रकारचे फुले व फळ झाडांचे बियाणे वापरून पत्रिका बनवली आहे. 

अशी आहे पत्रिका... 
लग्नात ज्याप्रमाणे पत्रिका बनवली जाते. त्याच प्रमाणे वंदना जोशी यांनी मुलाच्या लग्नानिमित्त पर्यावरणपुरक पत्रिका बनवली आहे. लग्न झाल्यानंतर पात्रिका फेकुन न देता ती पाण्यात भिजवून ठेवायची. त्यानंतर गोळा करुन तो कुंडीमध्ये ठेवायचा. त्यांनी बनवलेल्या पत्रिकेसाठी फुल आणि फळांच्या झाडाच्या बियांचा वापर केला आहे. त्यामुळे पत्रिकेचा गोळा तयार केल्यानंतर कुंडीत टाकल्याबरोबर चार ते आठ दिवसात अंकुर फुटते. अशा सुमारे 600 पत्रिका त्यांनी बनवल्या आहेत. जोशी या निसर्गप्रेमी आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळे काय करता येईल, या हेतून त्यांनी अगळी- वेगळी पत्रिका बनववली आहे. जुन्या कागदाचा लगदा घेऊन हॅडमेट पेपर तयार करुन त्यात फळ, फुले यांच्या बीया वापरुन शीट पेपर बनवले. पत्रिकेवर तिचा वापर कसा करायचा याची सूचना दिली आहे.

Webtitle : Environment friendly marriage card

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com