मनसेच्या महामेळाव्यासाठी सुरक्षेची जय्यत तयारी; पदाधिका-यांना बारकोड ओळखपत्रे

मनसेच्या महामेळाव्यासाठी सुरक्षेची जय्यत तयारी; पदाधिका-यांना बारकोड ओळखपत्रे

मुंबई : राज्यात बललेल्या राजकीय समिकरणाच्या पार्श्‍वभुमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसैनिकांत हुंकार फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी येत्या २३ जानेवारी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची तयारी करताना सुरक्षेची जय्यत तयारी केली असून प्रत्येक पदाधिका-याला बारकोड ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

राज्यात शिवसेना- भाजपची युती तुटून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी निर्माण झाली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांत शहरी भागात लाभ उठवण्यासाठी भाजपने सारे विसरून मनसे सोबत घरोबा करण्याचे सुतोवाच केले आहे. तर मनसेलाही पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी अशी काही गरज असल्याचे मनसे नेत्यांकडून खासगीत मान्य केले जात आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मनसेचा येत्या २३ जानेवारीला गोरेगाव येथील नेस्को मैदानावर महमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला राज्यातील कानाकोप-यातून सुमारे दोन लाख मनसैनिक आणण्याचा घाट घातला आहे. यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न संवेदनशिल बनला आहे. याची खबरदारी घेताना प्रत्येक पदाधिका-यांना त्याच्या नाव, पद, पत्यासह सुरक्षेचे बारकोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे. सुरक्षेसंदर्भातील बारकोड ओळखपत्राचा वापर मनसे पहिल्यांदाच करीत आहे. २३ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी दहा वाजल्यापासून सायकाळपर्यत ठाण मांडून बसणार आहेत. सायंकाळी राज यांचे भाषण होणार आहे.

Webtitle:  MNS tight security for 23 January

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com