मला उमेदवारीची अपेक्षा नव्हतीच - खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 मार्च 2020

जळगाव : राज्यसभेसाठी राज्यातील तीन जागांसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात राज्यसभेसाठी आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच; आणि तसेच झाले. अशी प्रतिक्रीया माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्‍त केली. 

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या (ता.13) आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारात माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या नावाऐवजी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याबाबत खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रीया व्यक्‍त केली. खडसे म्हणाले, राज्यसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा मुळात नव्हती. आज तेच समोर आले आहे. मला राज्याच्या राजकारणात रस असल्यामुळे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारींबाबत आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

Web Title: marathi news  The candidacy was not what was expected - khadse 

संबंधित बातम्या

Saam TV Live