रक्षकच बनला भक्षक.... दोन वर्षांपासून सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीसानेच  केला गोळीबार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर, दोन वर्षांपासून सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच हा गोळीबार केला.

उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला असून मुलावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 या घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल महिपाल याला अटक करण्यात आली. महिपालनं हा प्रकार का केला, याबद्दल त्याची चौकशी सुरू आहे.

 रितू आणि ध्रुव औषधे घेण्यासाठी गाडीतून उतरताच महिपालनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकताच मोठी गर्दी जमा झाली. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये महिपाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ध्रुवला कारमधून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र यानंतर तो घटनास्थळावरुन कार घेऊन फरार झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live