मंत्र्याचा दिलदारपण... पीएच्या पत्नीसाठी सुरु केली स्पेशल एसटी बस 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

आपण आतापर्यंत अनेकदा ऐकलं आणि पाहिलं असेल की मंत्री एखादं काम करण्यासाठी बराच वेळ घेतात... किंवा फक्त आश्वासनावरच बोळवण करतात.

पण कधी केवळा एका व्यक्तीसाठी विशेष सेवा केल्याचं कधी अनुभवलंय का?, नाहीना. पण ही तत्परता सध्या शिर्डीकर अनुभवत आहेत.

नगरचे पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांनी, आपल्या पीएच्या शिक्षक पत्नीसाठी चक्क विशेष एसटी सेवा सुरू केली आहे. केवळ एवढंच नव्हे तर जेव्हा त्या पीए पत्नीला शनिवार, रविवारी सुट्टी असते.

त्या दिवशी एसटीलाही सुट्टी असते. राहुरी ते पाथरे गावात गेल्या10 वर्षांपासून एसटी सेवा अविरत सुरू आहे. मात्र, ही एसटी सोमवार ते शुक्रवार नेहमीच्या थांब्यापासून 12 किलोमीटर पुढे असलेल्या वांगी गावापर्यंत जाते.

मात्र, दोन दिवस बंद असते. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी चालकाला जाब विचारला, तेव्हा आज मॅडमला सुट्टी आहे म्हणून वांगी पर्यंत बस न नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live