बारामतीत भाजपने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल - शरद पवार

बारामतीत भाजपने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल - शरद पवार

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बारामती जिंकणारच असा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करत भाजप बारामतीत जिंकल्यास लोकांचा निवडणुकांतवरील विश्वास उडेल असे म्हटले.

लोकांचा निवडणुकांवरील विश्वास जपायला हवा. त्यासाठी निवडणूक आयोगानं आवश्यक सुधारणा घडवायल्या हव्यात. लोकांचा विश्वास उडाल्यावर मग ती कोणत्याही टोकाला जातात. त्यामुळे त्यांचा विश्वास जपणं गरजेचं आहे, असेही पवार म्हणाले. बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या, त्यांच्यासमोर भाजपच्या कांचन कुल यांचे आव्हान होते.

दरम्यान, बारामती पाडली, तर त्यावर पुस्तक लिहावं लागेल असं विधान काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याशिवाय यंदा बारामती सुप्रिया सुळेंना जड जाईल, अशी विधानं भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला. 'ईव्हीएम हॅक करता येतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मात्र कोणतंही बटण दाबल्यास मत भाजपालाच जातं, अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. भाजपा नेत्यांचे बारामतीबद्दलचे दावे पाहता, त्यांनी काही नियोजन केलंय की काय, अशी शंका येते,' असेही पवार म्हणाले.

Web Title: People will lose faith on elections if bjp wins baramati says sharad pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com