सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या समुद्रकिनारीही उडणार सी प्लेन - सुरेश प्रभू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

सावंतवाडी - भारतात ‘सी प्लेन’ सुरू होत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या समुद्रकिनारीही ‘सी प्लेन’ लवकरच उतरेल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी मळगाव येथे केले. 

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन विकासासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयामार्फत उड्‌डाण-तीन योजनेतून पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मळगाव येथील सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर चांदा ते बांदा योजनेंतर्गत पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून १४ कोटींच्या रेलोटेल हॉटेलचा  भूमिपूजन समारंभ श्री. प्रभू यांच्या हस्ते झाला. या वेळी रत्नागिरी येथील वातानुकूलित रनिंग रूमच्या कार्याचा प्रारंभही रिमोट कंट्रोलद्वारे श्री. प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Web Title: marathi new seaplane service from sindhudurga and ratnagiri to resume soon suresh prabhu 

संबंधित बातम्या

Saam TV Live