सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा आज शपथविधी,
नवी दिल्ली : देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा आज शपथविधी होणार आहे... विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी शरद बोबडे यांची नियुक्ती झाली.. मूळचे नागपूरचे असलेल्या बोबडे यांनी अयोध्या निकालप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावलीय.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.
बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. बोबडे हे 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून प्रॅक्टिस केली. काही वर्षांच्या प्रक्टिसनंतर 1998 मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. त्यानंतर मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्तीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला
Web Title - CJI Ranjan Gogoi recommends Justice S A Bobde as his successor