मुख्यमंत्र्यांनी पोलीसांची खाती वळवली अॅक्सिस बँकेत ?

मुख्यमंत्र्यांनी पोलीसांची खाती वळवली अॅक्सिस बँकेत ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची पत्नी काम करत असलेल्या बँकेत पोलिसांचे पगार जमा करण्याचा निर्णय 2005 मध्ये झालेला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याविषयी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे बोलके असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा वापर करून त्यांची पत्नी काम करत असलेल्या बँकेचा व्यवसाय वाढवण्यास मदत केल्याची तक्रार नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्त्याने नागपूर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात केली आहे. आरटीआय कार्यकर्ते मोहनीश जीवनलाल जबलपुरे यांनी ही तक्रार नागपूर ईडी कार्यालयाला मंगळवारी सुपूर्त केली. एका दैनिकात 22 जून 2019 ला छापून आलेल्या वृत्ताचाही दाखला यावेळी तक्रारदाने दिला आहे. तक्रारीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी पोलिस खात्याला त्यांची पगाराची खाती बंद करून मुख्यमंत्र्यांची पत्नी काम करत असलेल्या बँकेत खाती उघडण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या बँकेला फायदा झाला असून राष्ट्रीयकृत बॅंकांचे नुकसान झाले आहे. 

याविषयी मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये मुंबई पोलिसांनी टेंडर प्रक्रिया प्रारंभ केली. कोणतीही बँक पुढे आली नाही. केवळ अॅक्सिस बँक पुढे आली आणि 2005 पासून तेथे पोलिसांचे वेतन देण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात पोलिस विभागाने केलेला खुलासा पुरेसा बोलका असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Mumbai Police clarification on Devendra Fadnavis and Axis bank issue

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com