VEDIO | जयंत पाटलांकडून शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन

VEDIO | जयंत पाटलांकडून शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप जारी केल्याने आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना हा पक्षादेश मान्य करावा लागेल. या व्हिपमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधीमंडळात बहुमत चाचणी वेळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनाच मतदान करावे, असे आदेश या व्हिपमधून देण्यात आला आहे. विश्वासदर्शक ठराव, पारदर्शक पद्धतीने होईल, असं मत जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालंय..मात्र आज उद्धव सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणारेय..यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हिप जारी केलाय....ठराविक एका बाजूने मतदान करण्यासाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हिप म्हणजेच पक्षादेश काढला जातो..दरम्यान राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत..या सगळ्या आमदारांना बहुमत चाचणीवेळी शिवसेनेला मतदान करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेत...विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणारेय...शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष आणि छोट्या पक्षांसह महाविकासआघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय..त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय.

अजित पवार यांनाही व्हिप लागू
दरम्यान, आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असताना, सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते प्रताप चिखलीकर यांची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय जातंय. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात भाजपशी हात मिळवणी करून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अजित पवार यांनी चिखलीकरांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढल्याचं मानलं जातंय. पण, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील यांनी व्हिप काढल्यामुळं अजित पवार यांना त्या व्हिपनुसार महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच सभागृहात मतदान करावे लागणार आहे. 

उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला?
महाविकास आघाडीकडे जवळपास 170 आमदारांचे बहुमत असल्याचा दावा नेत्यांनी केला होता. आता हे 170 आमदारांचे बहुमत महाविकास आघाडीला सभागृहात सिद्ध करावं लागणार आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून तसेच काही अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आज काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळं उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित झाले आहे. आता हे पद अजित पवार यांना देण्यात येणार? याची उत्सुकता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप पक्षाचा निर्णय झालेला नाही. यावर  शरद पवारच निर्णय घेतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. 

Web Title: ncp leader jayant patil Whip for party mla ajit pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com