पुणेकरांनो पत्ता सांगताना सावधान; खोटा पत्ता सांगितल्यानं गोळीबार

अमोल कविटकर
सोमवार, 13 मे 2019

पुण्यातल्या एका घटनेनं खळबळ उडालीय. हॉटेलचा पत्ता माहित असूनही तो न सांगितल्यामुळं कारमधून आलेल्या तिघांनी तरुणावर गोळीबार केलाय. त्याचं झालं असं तिघे आरोपी हे नगरवरून पुण्यात आले असताना त्यांनी सनी चौधरीला 'हॉटेल प्यासा'चा पत्ता विचारला... मात्र सुरुवातीला सनीनं पत्ता माहित नसल्याचं सांगितलं. त्यावर पत्ता सांग मग तुला हवं तिथे सोडतो असं सांगितल्यावर सनीने हॉटेलचा पत्ता सांगितला. पण पत्ता माहित असतानाही पहिल्यांदा विचारल्यावर का सांगितला नाही, याचा राग आरोपींच्या मनात होता.

पुण्यातल्या एका घटनेनं खळबळ उडालीय. हॉटेलचा पत्ता माहित असूनही तो न सांगितल्यामुळं कारमधून आलेल्या तिघांनी तरुणावर गोळीबार केलाय. त्याचं झालं असं तिघे आरोपी हे नगरवरून पुण्यात आले असताना त्यांनी सनी चौधरीला 'हॉटेल प्यासा'चा पत्ता विचारला... मात्र सुरुवातीला सनीनं पत्ता माहित नसल्याचं सांगितलं. त्यावर पत्ता सांग मग तुला हवं तिथे सोडतो असं सांगितल्यावर सनीने हॉटेलचा पत्ता सांगितला. पण पत्ता माहित असतानाही पहिल्यांदा विचारल्यावर का सांगितला नाही, याचा राग आरोपींच्या मनात होता. गाडीत बसल्यावर आरोपींनी त्याला दमदाटी केली आणि नंतर त्याच्या पायावर छर्र्यांच्या बंदुकीनं गोळीबार केला... यात सनी चौधरी जखमी झालाय. 

या प्रकरणी फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अंबादास होंडे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. पण पुण्यात घडलेल्या या घटनेनं परिसरात दहशत पसरलीय. 

Web Title :Marathi news Pune Person Shot For Not telling Address


संबंधित बातम्या

Saam TV Live