तो रोज प्रेयसीच्या कबरीवर झोपायचा आणि एक दिवस ती...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुरादपूर (उत्तर प्रदेश): प्रेमावर आधारीत अनेक चित्रपट आहेत. चित्रपटांमध्येच खरे प्रेम पाहायला मिळत असले तरी प्रेयसीच्या मृत्युनंतरही तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर चर्चेत आला आहे. दोघांमधील अनोख्या प्रेमाची चर्चा परिसरात रंगली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुरादपूर (उत्तर प्रदेश): प्रेमावर आधारीत अनेक चित्रपट आहेत. चित्रपटांमध्येच खरे प्रेम पाहायला मिळत असले तरी प्रेयसीच्या मृत्युनंतरही तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर चर्चेत आला आहे. दोघांमधील अनोख्या प्रेमाची चर्चा परिसरात रंगली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, काही दिवसानंतर तिच्या घरी समजते. प्रेमाला त्यांनी विरोध केला. आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी विष देवून युवतीचा खून केला. परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. प्रेयसीचा मृत्यू झाल्यामुळे प्रियकर नैराष्यात गेला होता. पण, तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. एक दिवस त्याच्यावरही गोळीबार झाला. परंतु, त्या गोळीबारामधून तो बचावला होता.

प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकर दररोज कबरीच्या ठिकाणी जाऊन रडत बसायचा. तासन तास तेथेच वेळ घालवायचा. काही दिवसानंतर प्रेयसीच्या कबरीवरच तो झोपू लागला. तिच्याशी एकटाच बोलू लागला. एक दिवस झोपेत असताना त्याला प्रेयसीचा मृत्यू नव्हे तर खून झाल्याचे स्वप्न पडले. झोपेतून उठला आणि पुन्हा तिच्याशी संवाद साधू लागला. खरंच प्रेयसीचा खून झाला का? याबद्दल माहिती घेण्याचे ठरवले.

प्रेयसीच्या मृत्यूनंतर तब्बर चार महिने त्याने कबरीवर घालवले. पण, खुनाचे स्वप्न पडल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कबर खोदल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन आहवालासाठी पाठवला. अहवाल हाती आल्यानंतर तिचा विष पाजल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कुटुंबियांनीच तिला विष पाजल्याचे समोर आले. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय, दोघांच्या खऱयाखुऱया प्रेमावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 

Web Title: real love story viral on social media at uttar pradesh


संबंधित बातम्या

Saam TV Live