नाचताना धक्का लागला म्हणून विद्यार्थ्याला बदडलं...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 जानेवारी 2020

पुणे : स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नृत्य करताना धक्का लागल्याने काही जणांनी आपल्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास जबर मारहाण केली. संबंधीत विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्यांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप अन्य तरुणांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधीत विद्यार्थी व महाविद्यालयाने तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.

पुणे : स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नृत्य करताना धक्का लागल्याने काही जणांनी आपल्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास जबर मारहाण केली. संबंधीत विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्यांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप अन्य तरुणांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधीत विद्यार्थी व महाविद्यालयाने तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.

नरेश तौर (वय 21, रा. धनकवडी, मुळ रा. लातुर) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पर्वती येथे तावरे कॉलनीमध्ये पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. नरेश या महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे.

शनिवारी त्यांच्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गतच दुपारी नृत्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी नरेश तौर हा नृत्य करीत असताना अन्य विद्यार्थ्यास त्याचा धक्का लागला. त्या कारणावरुन त्यांच्यामध्ये भांडणे झाली.

दरम्यान, रात्री कार्यक्रमाच्या ठिकाणीच नरेश हा मित्रांसमवेत जेवण करीत होता. त्यावेळी दुपारी भांडण झालेला विद्यार्थी हा महाविद्यालयातील अनुउत्तीर्ण(वायडी) विद्यार्थ्यांना घेऊन आला. पाच ते सहा जणांनी नरेश तौर या विद्यार्थ्यास जबर मारहाण केली. ही घटना अभाविपच्या तरुणांनी केल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे.

"पुर्वीच्या कारणावरुन माझ्यावर महाविद्यालयाच्या 10 जणांनी व बाहेरील गुंडांनी हल्ला केला आहे. शनिवारी मी सुस्थितीत नसल्यामुळे तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हंटले होते. परंतु कुटुंबीयांशी बोलल्यानंतर आता मला या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करायचा आहे.''
-नरेश तौर, विद्यार्थी.

"महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात किरकोळ कारणावरुन विद्यार्थ्यांची भांडणे झाली. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. घटना घडल्यानंतर मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो. विद्यार्थ्याला रुग्णालयात नेऊन तपासण्याही केल्या. मात्र त्यास जबर मारहाण झालेली नाही. विद्यार्थी व महाविद्यालयाने रात्री तक्रार देणार नसल्याचे लिहून दिले. तरीही त्यांना तक्रार द्यायची असल्याची आमची हरकत नाही. आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी माझ्याकडे कोणीही आलेले नाही.''
-देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दत्तवाडी पोलिस ठाणे.

"महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये झालेली भांडणे आहेत. त्याचा आमच्या संघटनेशी संबंध नाही. या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. परिषद मारहाणीच्या घटनांना थारा देत नाही. आरोप करणाऱ्यांनी आगोदर शहानिशा करावी.''
-अनिल ठोंबरे, शहर महामंत्री, अभाविप.

 

Web Title: A student was beaten up due to personal disputes In pune


संबंधित बातम्या

Saam TV Live