VIDEO | त्यानं अंडरवेअरमध्ये लपवलं सोनं आणि...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे : चक्क अंडरवेअरमध्ये एकाने 74 लाख रुपयांचं सोनं लपवलं होतं. ही घटना आहे पुण्यातली. लोहगाव विमानतळावर ही कारवाई करण्यात आलीय. अंडरवेअरमध्ये सोनं लपवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय.  दुबईहून आलेल्या विमानातून तस्करीच्या उद्देशाने एका प्रवाशाने आणलेले हे सोने आणले होते. शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पेनकर झाहीद असं या प्रवाशाचं नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती यावेळी त्याच्या जीन्स पँटच्या आतल्या खिशांत एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरूपातील सोने आढळले.

पुणे : चक्क अंडरवेअरमध्ये एकाने 74 लाख रुपयांचं सोनं लपवलं होतं. ही घटना आहे पुण्यातली. लोहगाव विमानतळावर ही कारवाई करण्यात आलीय. अंडरवेअरमध्ये सोनं लपवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय.  दुबईहून आलेल्या विमानातून तस्करीच्या उद्देशाने एका प्रवाशाने आणलेले हे सोने आणले होते. शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पेनकर झाहीद असं या प्रवाशाचं नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती यावेळी त्याच्या जीन्स पँटच्या आतल्या खिशांत एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरूपातील सोने आढळले. तर दुसरी प्लॅस्टिकची पिशवी त्याने अंडरवेअरमध्ये ठेवली होती. असे एकूण 74 लाख 41 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलेत.

झाहीद हा शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दुबईहून आलेल्या स्पाइस जेट या विमानातून आला. त्या वेळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती. त्या वेळी त्याच्या जीन्स पॅंटच्या अंतर्गत खिशांमध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरूपातील सोने आढळले. तर दुसरी प्लॅस्टिकची पिशवी त्याने अंतर्वस्त्रामध्ये ठेवली होती. असे एकूण 2196 ग्रॅम वजनाचे 74 लाख 41 हजार रुपये किमतीचे सोने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून जप्त केले.

सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे, पुणे विभागाच्या सीमाशुल्कचे उपायुक्त मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पळनीटकर व प्रतिभा माडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. झाहीदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: 74 lakh gold hidden in underwear seized at pune Airport


संबंधित बातम्या

Saam TV Live