अमृता फडणवीसांचा पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 डिसेंबर 2019

मुंबई : ऍक्सिस बँकेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यांवरून चर्चा सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राज्याच्या नेतृत्वावर टीका केली आहे. 

Having a bad leader was not Maharashtra’s Fault - But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे, की राज्याला वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही. पण, आपण एकासोबत राहिले पाहिजे, जागो महाराष्ट्र! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून हे ट्विट केल्याने त्यांच्यावर पुन्हा टीका होण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीस यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीचे ट्विटला रिट्विट करत हे वक्तव्य केले आहे. सरकार देवेंद्र फडणवीस आणि मला लक्ष्य करत असल्याचे अमृता यांनी म्हटले आहे.   

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी 'फक्त 'ठाकरे' आडनाव लावले म्हणून कुणी 'ठाकरे' यांच्यासारखे होत नाही,' अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली असता, शिवसेनेनेही त्यांना जशास-तसे प्रत्युत्तर दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा उल्लेख करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, की एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्त्वे आणि लोकांचा विचार केला. पक्ष व कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान त्यांनी दिले. यावर नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी अमृता या व्यक्ती म्हणून कोणत्याही विषयावर त्यांचे मत मांडू शकतात. व्यक्ती म्हणून त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, असे म्हटले होते.

Web Title: Amruta Fadnavis tweet against Uddhav Thackeray lead government

संबंधित बातम्या

Saam TV Live